थालीपाक ऐकता । हरि व
318.
थालीपाक ऐकता । हरि वारी जन्मव्यथा ॥1॥
दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी ॥2॥
सेवे बहुत तोषविला । वर माग तू इच्छिला ॥3॥
शिष्यासह रानी जावे । इच्छाभोजन मागावे ॥4॥
अंतर शाप द्यावा । आता जातो वर द्यावा ॥5॥
हर हर शब्द थोर केला । झाला वनांत गलबला ॥6॥
नवल सर्वासी वाटले । जनी म्हणे ऋषि आले ॥7॥
