कैसा हा हाट कवणाची ग
316.
कैसा हा हाट कवणाची गोणी । वेगळाचि राहिला मालधणी ॥१॥
कवणाचा वाण विकितसे कवण । अवघा पसारा ठेवी झाकोन ॥२॥
मावळला दिन झाकलासे हाट । अवघा बोभाट वारलासे ॥३॥
चोखा म्हणे माप भरियेले सिगे । आता कोणाचे पदरी देऊ उगे ॥४॥