वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 134. सिताशुद्धी

सीताशुद्धी

🙏 4. संत नामदेव · ABH-083180 · अभंग क्र. ३२०

320.
सीताशुद्धी

हनुमंत गेला सीताशुद्धिलागी | लंका मध्यभागी घेऊनिया ॥१॥
माता जानकीच्या करीत शुद्धीसी | हिंडे गृहदेशी राक्षसांच्या ॥२॥
न देखे तो सती सीतादेवी माया | अकस्मात तया वनामाजी ॥३॥
शिंसीवावृक्षाचे असे तळवटी | समीप निकटी राक्षसाचे ॥४॥
न चले उपाय कांही तो बोलाया | स्मरे रामराया तये काळी ॥५॥
श्रीरामे मुद्रिका दिली होती संगे | तयासी अव्यंग सोडावया ॥६॥
वृक्षाचिया माथा बैसोनिया बळी | देत करकमळी सोडूनिया ॥७॥
जानकी अवलोकी श्रीरामाची मुद्रा | कोठोनी कपींद्रा शआणलीसे ॥८॥
सुखी रामराणा कवणिये वना | माझिया त्‌ प्राणा बोले वेगी ॥९॥
ऐकोनि कपींद्र चरणासी वंदी | म्हणे रामचंद्र सुखी असे ॥१०॥
सहितसौमित्र वनामाजी आहे | शुद्धीलागी पाहे पाठविले ॥११॥
तुझेनि वियोगे रामराजा दुःखी | यालागी तुज देखी पाठविले ॥१२॥
ऐकतांचि वाणी करीत आक्रोशा | म्हणे राम कसा सोडियेला |॥१३॥
नानापरी खेद आलाप करूनी | हा हा रामवाणी बोलतसे ॥१४॥
समीप जे होते रक्षपाळ बळी | ऐकोनि आरोळी दूर जाले ॥१५॥
तये संधीमध्ये हनुमंत खालौता | येवोनिया माता वंदितसे ॥१६॥
क्षुधाक्रांत भारी म्हणे काय खाऊ | सांगसी उपाऊ तरी येथे ॥१७॥
वनामाजी मेवा घेऊनिया कांही | क्षुंघेसी ते पाही शांतवावी ॥१८॥
म्हणे सीता दूता रक्षपाळ होती | निरोध करिती तुजलागी ॥१९॥
म्हणोनिया पाही भूमिगत कांही | घेऊनि स्वदेही विश्रांतीसी |॥२०॥
पडले ते घेई ऐसी आज्ञा पाही | वंदोनिया पायी संतोषला ॥२१॥
करोनी उड्डाण वृक्षमाथा बैसे | उपडोनि झाडास हालवीत ॥२२॥
खाली पाडी फळे तयांचे भोजन | करूनिया वन विध्वंसिले ॥२३॥
रक्षपाळ सारे मिळोनी कपींद्रा | घरावया सारा यत्न केला ॥२४॥
न चढ हातासी बहु बळ त्यासी | राक्षसा विध्वंची हातपा ॥२५॥
वृक्षाचेनि घारे भारिले उपाये | देखी बळ सोय दाखवीत ॥२४॥
जंबूमाळी बागी तया अधिकार | धावोनी सत्वर रायापादी' ॥२७॥
मात ते घेऊनि आला तो धांवुनि | कपीराज वनी आला एक ॥२८॥
त्याने सर्व वन पाडिले उपडोन | कोणाचा तो कोण कळेना हो ॥२९॥
राजा करी आज्ञा धरा बांधा त्याला | मारा वानराला वेगी जारे ॥३०॥
एकतांचि वाणी भुपामुखींची हो | उठिले लवलाही राक्षसगण ॥३१॥
जावोनि वेढिला कपिराजराणा | धनुष्यासी बाणा लावूनिया ॥३२॥
मारिता बाणासी न लागे कपीसी | तेव्हा युक्ति कैसी आरभिली ॥३३॥
करूनि फांसासी धरू म्हणती त्यासी | न ये तो फांसासी आटोपिता ॥३४॥
धरिती जरी बाही निघोनिया जाता | न चढे तो हाता कवणाच्या ॥३५॥
थोर जरी फांसा होत तो लहान | जाय तो निघोन फांद्यांतुनी ॥३६॥
लहान जरी केला तरी होतो थोर | फांशाचा विचार व्यर्थ करिती |॥३७॥
ऐक्षापरी जाले श्रमातुर भारी | कपि तो विचारी कार्य पुढे ॥३८॥
म्हणून फांशात पडे तो तेधवा | धरोनी वानरा नेती दूत ॥३९॥
सन्मुख रावणे देखुनि कपीसी | करी कौतुकासी अपूर्व हो ॥॥४०॥
कधी नाही ऐसे स्वरूप देखिले | येणे फार केले नाशालागी ॥४१॥
पुसत तू कोण कवण कार्यालागी | पातलासी वेगी याच ठायी ॥४२॥
वानर म्हणे आलो मूर्खा रावणा रे | रामदूत खरे सीताशुद्धि ॥४३॥
ऐकोनि रावण म्हणे यासी जाळा | शेपूट गुंडाळा अग्नि लावा ॥४४॥
कपीसी पुसिले मरण कोणे ठायी | येरू पुच्छ दावी म्हणोनिया ॥४५॥
समग्र लंकेची आणोनिया वस्त्रे | कपी पुच्छ पुरे न होयची ॥४६॥
तेव्हा राजधानी आणोलति वेष्टिता | परी तो पुरता न होयची ॥४७॥
तेव्हा तेल घाला म्हणे तो रावण | दूत ते धांवोन टाकिताती ॥४८॥
लावूनि अग्निसी केला मोठा ज्वाळ | वानर तत्काळ उडाला हो ॥४९॥
लंकेची ते केली सारी तेणे होळी | सहित मंडळी राजघरे ॥५०॥
भुभुक्कार केला वानर उडाला | लंकेमाजी जाला प्रळय हो ॥५१॥
अग्निचा उबाळा धुराते दाटला | देखे कपी त्याला सुखरूप |॥५२॥
मुखासी लागला पाहतांची डोळा | म्हणोनि तो जाला शामवर्ण ॥५३॥
येवोनी लवलाही श्रीरामाते पाही | नमूनि सर्वही सांगितले ॥५४॥
तेव्हा नामा म्हणे होतो मी जवळा | चरणकमळा ध्यात तेथे ॥५५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग