जो हा उद्धार प्रसवे
322.
जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । ते रुप सुंदर विटेवरी ॥१॥
ध्याता ध्यान ध्येय जेथे पै खुटलें । ते प्रगटलें पंढरीयें ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । ते रुप सानुलें पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥
