न करी न करी आणिक साध
322.
न करी न करी आणिक साधन । नामयाने खूण सांगितली ॥१॥
संसार सागर भरला दुस्तर । तारक निर्धार विठ्ठल हा ॥२॥
मंत्रांचा हा मंत्र त्रिअक्षरी सोपा । तुटताती खेपा जन्म मरण ॥३॥
चोखा म्हणे माझा धन्य गुरूराव । दाखविला देव हृदयी माझ्या ॥४॥
