आमुचे मिळणी मिळू नका
314.
आमुचे मिळणी मिळू नका कोणी ।
विषय सांगतिनी बाईयानों ॥१॥
नव्हे तैसे बळ विवेक विचार ।
नका करू चार जनामाजी ॥२॥
जवरी आहे तुम्हा मागील बोभाट ।
तवरी काही नीट होऊ नका ॥३॥
जन-लाज शेष आहे जो मनास ।
तोवरी उदास होऊ नका ॥४॥
सासुर माहेर जोवरी आहे तुम्हा ।
कुंथूनिया प्रेमा आणू नका ॥५॥
बहेणि म्हणे नका फजिती फुकाची ।
करू या जीवाची वायावीण ॥६॥
