गुंडाळिल्या जटा तोचि
318.
गुंडाळिल्या जटा तोचि माथा फेटा | गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥
वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी | दावावया जगी योग करी ॥२॥
आकर्ण लोचन हाती चापबाण | वल्कले भूषणे नेसोनिया ॥३॥
पितृवचनालागी मानोनि साचारी | जाला पादचारी वनी हिंडे ॥४॥
देवांचिया काजी ठेवोनिया निज | सर्वांपरी सज्ज जाला अंगे ॥५॥
नामा म्हणे त्यांचे न कळे कौतुक | आपुलिया सुख वाढावया ॥६॥
