भक्तिभाव आम्ही बांधि
321.
भक्तिभाव आम्ही बांधिलासे गाठी ।
तेणे आम्हा तुटी कासयाची ॥१॥
गाऊ नाचू प्रेमे हरिनाम कीर्तनी ।
भावोनिया जनी जनार्दन ॥२॥
खाऊ वाटू लुटु उदारासारिखे ।
सरे ऐसे देखे नाही नाही ॥३॥
कोणाचिया घरा जावे घ्याया देया ।
स्वप्नी भोगावया दैन्य नाही ॥४॥
बहेणि म्हणे भक्ता कासयाची चिंता ।
गाठीसी असता पांडुरंग ॥५॥
