मध्यरात्री ऋषिसहित ।
319.
मध्यरात्री ऋषिसहित । वना आले अकस्मात् ॥1॥
पंडुसुत जागे झाले । ऋषि समस्त वंदिले ॥2॥
धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे ॥3॥
द्रौपदीने धावा केला । देव जेविता उठिला ॥4॥
ऋषि तृप्त केले वनी । म्हणे नामयाची जनी ॥5॥