वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 133. रामचरित्र

श्रीराम सोयरा आला मा

🙏 4. संत नामदेव · ABH-083020 · अभंग क्र. ३१९

319.
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा | दिधला म्या थारा हृदयी माझ्या ॥१॥
पावलो विश्रांति धाले माझे मन | न लगे आता ध्यान शिकावया ॥२॥
ज्यासाठी हिंडणे जटामौनमग्न | धरिले तेणे ठाणे हृदयी माझ्या ॥३॥
योग याग तप करावे साधन | तोहि जाण ओठी सदा वसे ॥४॥
तीर्थयात्रा देव ज्यासाठी करावे | ते ब्रह्म वरवे नांदे देही ॥५॥
ब्रह्मचर्यादिक आश्रम साधावे | केली तया देवे देही वस्ती ॥६॥
|वेदशास्त्र पुराण ज्यासाठी पठण | तो नांदे परिपूर्ण हृदयी माझ्या ॥७॥
ऐसा तो सज्जन जिवलग सांगाती | दिधली मज विश्रांती नामसंगे ॥८॥
तैसे नव्हे ज्ञान फुटक्या हांडोर्‍याचे | धरूनिया पाचे खोखा वाजे ॥९॥
स्वधर्मी विचार वेदांचे अन्वये | लाधले हे पाय गुरूकृपे ॥१०॥
अभंग भंगेना फोडिता फुटेना | गुरूकृपे जाणा प्राप्त जाले ॥११॥
चावळी वटवट बोलणे बासर | हे तंव अवघे चार मर्कटाचे ॥१२॥
परनिंदा परद्रोहो करणे या संतांचा | जाळावी ते वाचा ज्ञान त्याचे ॥१३॥
न लगे सोंग धरणे देह ताप करणे | ऐसे निज ध्यान हाता आले ॥१४॥
नाम घेता रूप हृदयी बिबले | सर्वत्र देखिले तेचि डोळा ॥१५॥
नाममंत्र बीज नाही जंववरी | केशव तंववरी प्राप्त नाही ॥१६॥
|नामाचे धारक केशवरूप देख | वैकुंठीचे सुख रुळे पायी ॥१७॥
नामेंविण ज्ञान नपुंसक ऐसे | नातळती कसे साधुसंत ॥१८॥
|नाम तेंचि रूप रूप तेंचि नाम | नामरूपा भिन्न नाही नाही ॥१९॥
आकारला देव ताम रूपा आले | म्हणुनि स्थापिले नाम देवे ॥२०॥
नामा परता मंत्र नाही दो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥२१॥
नामा म्हणे ज्ञान केशव केवळ | जाणती प्रेमळ भले भले ॥२२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग