कोणाचा संग धरू कोणास
317.
कोणाचा संग धरू कोणासाठी । तो दु:खाचीच मिठी पडे तेणे ॥१॥
म्हणोनी नामयाचे धरियेले पाय । आठविता होय समाधान ॥२॥
सुखाचे सुख मज दावियेले डोळा । आनंद सांवळा विटेवरी ॥३॥
चोखा म्हणे माझा नामदेव प्राण । घालीन लोटांगण जीवे भावे ॥४॥
