वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

पढियंते कीरु जाणसी त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074740 · अभंग क्र. ३१२

312.
पढियंते कीरु जाणसी तरी ।
तो ठावो दृष्टीसी दूरी ।
सिंहुरी मोकारेवीण प्रतिबिंबासी ।
चेतना लाहे ऐसे कीजे रया ॥
आवडी वेचूनिया डोळिया ।
पुढे रिता का रिगतोसी ।
तूचि तू सर्वाभूती ऐसे जरी जाणसी ।
तरी साचे भेटी केउता जासी रया ॥
अरे हा दुजेवीण खेळु मांडिला ।
हरिजैत अनुठायी नाही ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
तुज जाणतयासी काय जाणणे रया ॥

अर्थ :
हे पांडुरंगा तुला प्रेमळ भक्त. सगुण रुपाने जाणतात तथापि वास्तविक जाणावयाचे तुझे निर्गुण रुप ते त्यांच्या दृष्टीला दूरच असते. सिंह मोकळा नसून विहीरीजवळ बांधलेला असेल तर आपले प्रतिबिंब विहीरीत पाहून त्याच्याशी ऐक्य करण्याची जशी त्या सिंहाला चेतना उत्पन्न होते. त्याप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुझे यथार्थ स्वरुप पाहाण्याची चेतना त्या प्रेमळ भक्तांना उत्पन्न व्हावी असे कर. त्याचे निर्मळ प्रेम पाहून त्याच्या डोळ्यापुढे सगुण रूपाने का प्रगट होतोस ? जर तुला ठाऊक आहे की, या सर्व भूतमात्रामध्ये आपणच व्याप्त तरी मग त्यांना निर्गुण रुपाने भेट देण्याचे सोडून सगुणरुपाने भेट देण्याच्या आवडीने का जातोस. अरे दुसरेपणावाचून हा द्वैताचा खेळ तू मानला असून त्यात निर्गुण रुपाने तुला पहाणायाचा जय किंवा सगुणरुपाने पाहणारयाचा पराजय पण हे दोन्हीही जय, पराजय तुझ्या स्वरुपावाचून दुसरीकडे नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठला तुम्ही असा विचार कर की त्या भक्तांना तुझे निर्गुणरुप जाणण्याशिवाय दुसरा काय विषय आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग