दूत विनविती कर जोडुन
317.
दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावे विमानी ॥1॥
ऋषि म्हणे न घडे ऐसे । ह्याची तृप्ति नाही आस ॥2॥
पटावरोनी काढिला । पटी बैसवीन ह्याला ॥3॥
थोर वाजत गाजत । विप्र मंत्रघोष करीत ॥4॥
विजयी झाला हरिश्चंद्र । आडवा पावला परिवार ॥5॥
लक्षानुलक्ष आरत्या करिती । नगरनारी वोवाळिती ॥6॥
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनी आनंदाला ॥7॥
राया प्राप्ती जाला पट । गुडी उभवी वसिष्ठ ॥8॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥9॥.
