वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

ऐसे क्रमिता अवधारी ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073904 · अभंग क्र. ३१२

312.
ऐसे क्रमिता अवधारी । विश्वेश्वराची नगरी ॥1॥
देखियेली वाराणसी । थोर आनंद मानसी ॥2॥
म्हणती घ्यावे शिवदर्शन । तेणे श्रम निवारण ॥3॥
बाप येऊनि चौबारा । उभा धरुनि पदरा ॥4॥
म्हणे कोठेंरे दक्षणा । बरा होसी चुकावणा ॥5॥
जो का राजा सूर्यवंशी । छत्र चामरे जयासी ॥6॥
माथा बांधोनिया तृण । घाली विक्रया आपण ॥7॥
राणी म्हणे प्राणेश्वरा । आधी विक्रा माझा करा ॥8॥
रोहिदास कर जोडुनी । चरणी मस्तक ठेवुनी ॥9॥
आधी माझिया द्रव्यासी । तुम्ही द्यावे कौशिकासी ॥10॥
ऐसे दोघांचे उत्तर । नवल करी ऋषिश्वर ॥11॥
काय करा याच्या बोला । म्हणे वजनी सोने घाला ॥12॥
अग्निहोत्री तो ब्राम्हण । उभा रायापे येऊन ॥13॥
देई तारामती तुक । एक भार हा कनक ॥14॥
रोहिदास म्हणे ताता । माता स्नेह माझ्या चित्ता ॥15॥
राव बोलिला वचन । शीघ्र यावे बा भेटोन ॥16॥
उभी राहोनी वेल्हाळा । पोटी बाळाचा उमाळा ॥17॥
अश्रु ढाळिती लोचन । हा हा शब्दे करी रुदन ॥18॥
बोले कौशिक ये माते । स्नेह सोड चाल पंथे ॥19॥
करुनिया ताडातोडी । पाहे कवतुक आवडी ॥20॥
माता म्हणे बाळकासी । ममता असू दे मजपाशी ॥21॥
रोहिदास ताराराणी । तेही घेतली ब्राम्हणी ॥22॥
मोल देऊनिया दुणे । राव घेतला डोंबाने ॥23॥
घेऊनिया घरा आला । येऊन सांगतो भार्येला ॥24॥
सेवक आणिला तुम्हासी । सेवा घ्यावी आवडेल तैसी ॥25॥
घागर घेऊनिया हाती । पाणी आणी शीघ्र गति ॥26॥
कुंभ घेऊनि चालिला । खडा हाणोनि फोडिला ॥27॥
रिक्तपाणी येता त्यासी । अवघे धुमसिती रायासी ॥28॥
हा तो पहिलाच शकून । पुढे येणे काय करणे ॥29॥
म्हणती हा तो नव्हे भला । यासी ठेवा स्मशानाला ॥30॥
राव रक्षी स्मशानासी । म्हणे नामयाची दासी ॥31॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग