शस्त्राचे पै घाय सोस
313.
शस्त्राचे पै घाय सोसवती सदा ।
परी हे जननिंदा सोसवेना ॥१॥
ऐसिया साधने रोकडेचि फळ ।
ब्रह्म हे केवळ प्राप्त होय ॥२॥
करवते दान तप व्रत स्नान ।
जननिंदा जाण सोसवेना ॥३॥
योग याग तीर्थ करवेल अनुष्ठान ।
जननिंदा जाण सोसवेना ॥४॥
बहेणि म्हणे जन निंदोत सकळ ।
आत्मत्वी निश्चळ ठेवी मन ॥५॥
