येरीकडे ताराराणी । द
314.
येरीकडे ताराराणी । द्विजा घरी वाहे पाणी ॥1॥
छिद्र पाडोनी रांजणा । पाणी त्यामध्ये थारेना ॥2॥
नानापरीचे गांजणे । देती गाळी हो प्रदाने ॥3॥
पाणी वाहणे की खेळा । होऊ आली सांजवेळा ॥4॥
काळ कौशिक ब्राम्हणे । नित्य अग्निहोत्र करणे ॥5॥
रोहिदासा आज्ञा करी । समिधा आणाव्या झडकरी ॥6॥
संगे घेऊनिया गडी । वना चालिला तांतडी ॥7॥
धरुनिया सर्पवेष । रोहिदासा केला दंश ॥8॥
येउनी सांगती मातेस । सर्पे खादले पुत्रास ॥9॥
गेला चंद्र उतरोनी । दिसे जैसी म्लान वदनी ॥10॥
करुणा आली ब्राम्हणासी । जाय सांभाळी पुत्रासी ॥11॥
रडे मोकलोनी धाय । म्हणे आता मी करु काय ॥12॥
काय करू आता कैसे । कोठे गेले हो पाडस ॥13॥
प्राण राहिला संकटी । करा पाडसाची भेटी ॥14॥
निबिड अंधार काळोख । दीर्घस्वरे मारी हाक ॥15॥
ठेंचा पायी अडखळत । पुढे पायासी लागत ॥16॥
बाळ कवळोनी हात । जनी म्हणे शंख करीत ॥17॥
