वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

श्रुती सांगितले उपनि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074761 · अभंग क्र. ३२१

321.
श्रुती सांगितले उपनिषदी अनुवादले ।
आम्हा लाधले निरूते वर्म ॥
अनुभवे गोविंदु करिता अनुवादु ।
परब्रह्म आनंदु तरी ते नव्हे ॥
बोलिजे ते नव्हे दाविजे ते नव्हे ।
गुरूमुखी पाहावे परमानंदे ॥
अरूप परी बरवे दिसे ।
भीतरी कैसे विनवीतुसे ॥
अनुभविया प्रति बोलिजे लक्षण ।
ज्ञानदेवे खूण सांगितली ॥

अर्थ :
श्रुतीने सांगितले असून उपनिषदाने अनुवाद केलेले ब्रह्मप्राप्तीचे वर्म आम्हाला चांगल्या रितीने प्राप्त झाले. सगुण गोविंदाचा अनुभव घेऊन अनुवाद करतो परंतु शुद्धब्रह्माचा अनुवाद करता येत नाही? व त्यास दाखविताही येत नाही. असे जरी आहे तरी रूप ब्रह्म गुरूमुखानेच समजून घ्यावे ते स्वरूपतः अरूप असले तरी सगुणरुपात फार चांगले दिसते. अशी त्याच्या स्वरूपाची अंतखूण आहे. या खुणेचा अनुवाद अनुभवी लोकांना विनंती करून मी सांगत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग