जगांचे जीवन भक्तांचे
315.
जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥
ते रुप गोकुळीं नंदाचिये घरी । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥
इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरी ॥३॥
सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणता उगा राहे ॥४॥
एकाचि पदें बळीं पाताळी घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥
जयाचेनी तृप्त त्रिभुवन सगळे । तो लोणीयाचे गोळे मागुन खाय ॥६॥
एका जनार्दनी भरुनी उरला । तो असे संचला विटेवरी ॥७॥
