वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

अनामिक त्यासी पुसे ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073914 · अभंग क्र. ३१३

313.
अनामिक त्यासी पुसे । तुमचे भोजनाचे कैसे ॥1॥
कर संपुष्‍ट जोडुनी । राव विनवी मधुर वचनी ॥2॥
जेणे निघे तुमचे काम । राखा माझाही स्वधर्म ॥3॥
नृपा दिले कोरे अन्न । सुखे करावे भोजन ॥4॥
धान्य घेऊनिया करी । राव आला गंगातीरी ॥5॥
स्नान संध्या नेम सारी । राजा स्वयंपाक करी ॥6॥
गाय अग्नीचा पै ग्रास । ठाव वाढिला धर्मास ॥7॥
ग्रास घालावा वदनी । आला विश्वामित्र मुनी ॥8॥
बैसावे जो भोजनासी । अकस्मात पावे ऋषी ॥9॥
एक भाग भक्षियेला । दुजा राजाचा उचलिला ॥10॥
तृप्त होवोनि ऋषेश्वर । उठे देउनी ढेकर ॥11॥
पदर कसुनी कटासी । सदा सादर सेवेसी ॥12॥
निराहार शक्तिहीन । दिसे जैसा रंक दीन ॥13॥
ऐसा छळी प्रतिदिनी । म्हणे नामयाची जनी ॥14॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग