किती किती वाण एकचि प
314.
किती किती वाण एकचि प्रकार । न करिता सारासार न भरे गोणी ॥१॥
नवल वाटले हाटते गुंतले । रिकामे आले गेले वायाविण ॥२॥
फिरत फिरत जे जे वाण पाहाती । हांवचि भरती रिती गोणी ॥३॥
चोखा म्हणे हे तो न कळे लाघव । वोळखे जो धांव डाव विरळा एक ॥४॥
