कमळगभींचा पुतळा । पा
313.
कमळगभींचा पुतळा । पाहता दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥
वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगी चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥
उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥
रुप साजिरे गोजिरे । दृष्टि पाहता मन न पुरे । एका जनार्दनी झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥
