वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

मन मुरे मग जे उरे ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074780 · अभंग क्र. ३१३

313.
मन मुरे मग जे उरे ।
ते तू का रे सेवीसिना ॥
दिसते परी न धरवे हाते ।
ते संताते पुसावे ॥
तेथीची खुण विरुळा जाणे ।
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे ॥

अर्थ :
मनांतील संकल्प विकल्प नाहीसे झाल्यावर ते मन मनपणाने शिल्लक राहात नाही त्याठिकाणी परमात्माच एक शिल्लक राहतो. त्याचे ज्ञान तू का करुन घेत नाहीस. तो परमात्मा ज्ञानाने दिसतो.. तरी पण तो निराकार असल्यामुळे त्याला हाताने धरता येत नाही. अशा त-हेचा जो परमात्मा त्याचे ज्ञान होण्याकरिता संतांना नम्र होऊन मला त्या परमात्म्याचे ज्ञान करुन द्या अशी विनंती करावी लागते. व हे वर्म क्वचित लोकांनाच कळते. संतांचे कृपेने ज्ञान होते हे मला श्रीनिवृत्तीरायांच्या प्रसादाने कळले असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग