वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

सुख सोज्वळ मोतियाचे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074840 · अभंग क्र. २६८

268.
सुख सोज्वळ मोतियाचे लेणे । दिधले जाई जणे बाईये वो ॥
देशी नाही देशाउरी नाही । हाटणी नाही ते पाटणी नाही ॥
लक्षाचेनि लाभे जोडले निधान । बापरखुमादेविवरा विठ्ठलु जाण ॥

अर्थ :
संसाराची दुःखे भोगीत असता कष्टी झालेली जी मी, त्या मला श्रीकृष्णाने मुक्तिरूप सोज्वळ अलंकार दिला अशाश्वत संसार कोठे आहे. म्हणून पाहू गेले तर तो बाजारात किंवा नगरांत नाही. तसेच रानावनांत नाही. देशात नाही. तत् पद लक्ष्याचा लाभ म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा लाभ हेच मला निधान म्हणजे मोठा ठेवा प्राप्त झाला आहे. तो ठेवा कोणता म्हणाल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हेच होय. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग