वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 43. देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते २७१

अहं तृणावर्त बळी । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084548 · अभंग क्र. २६९

269.
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळी । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥
रज उधळले तेणे बळे । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाही हे न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणे । न दिसे रजोगुणें । मायें काय करु वो ॥३॥
कैसे निबीड निबीड रज । मीचि न देखे मज । तेथे कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥
तळमळीताहे मन । गेले निधान । संता सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥
बाळ सांवळे देखोनिया दिठी । आला धांवोनि उठाउठी । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥
वेगे नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाही बा ॥७॥
जडला कृष्ण अंगी । कृष्णचि जाला वेंगी । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥
संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्ही देख । येणे जाणे निःशेष । खुंटले त्यांचे ॥९॥
कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवी मीठ । विरोनि जाय ॥१०॥
तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणे देहा घातु । करुनी ठेला ॥११॥
पाहता वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनी । बैसविली निजपदीं ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग