सुखाची सुखराशी आम्हा
273.
सुखाची सुखराशी आम्हांसी वोळली । ती गाय देखिली पंढरीये ॥१॥
ज्ञानदेव फावली नामदेवा लाधली । परमे पान्हा घाली भाविकांसी ॥२॥
गोरा आणि सांवता परिसा भागवत । वासुरे पाजित आवडींने ॥३॥
चोखा म्हणे गाय ती पंढरीये आहे । एक वेळा पाहे अरे जना ॥४॥
