वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्रह्म जाणे तोचि बोल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075951 · अभंग क्र. २७१

271.
ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण ।
वेदींचे वचन साक्ष यासी ॥१॥
पहा अनुभव आपुलिया देही ।
शास्त्रासीही ग्वाही करोनिया ॥२॥
द्वादशकुळांचे जया अंगी तेज ।
सूर्य तो सहज न बोलता ॥३॥
राजचिन्हे अंगी राजा तोचि एक ।
करी जो कनक परीस तो ॥४॥
पुरवील कामना तेचि कामधेनू ।
वारील मरणु अमृत ते ॥५॥
बहेणि म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता ।
ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग