वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

व्यक्ताचे अव्यक्ती प

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074813 · अभंग क्र. २७६

276.
व्यक्ताचे अव्यक्ती पाहाता पै न दिसे ।
आपींआप रसे व्यक्त हरि ।
बाहेजु भीतरी आदिमध्य उर्ध्व ।
हृदयी सन्निध बिंबलासे ॥
ऐसीये दशे ते अव्यक्त भुंजसी ।
मी माझ्या मोहासी सांडी रया ।
बापरखुमादेविवर व्यक्त व्यक्ती अव्यक्त ।
अवघे संचित हरि आहे ॥

अर्थ :
विचार दृष्टीने पाहिले असता अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी नामरुपात व्यक्त जगत दिसत नाही. तसे पाहिले तर जगत, अधिष्ठान दृष्टीने परमात्मा आहे. तो हरि आत बाहेर, आदि, मध्य आणि हृदयांत व्यापक रूपाने आहे. व आभास रूपाने हरिच आहे. अशा अव्यक्त हरिला प्राप्त हो. आणि मी व माझे अशा मोहाचा त्याग कर. व्यक्त, अव्यक्त, व्यक्ति, संचित हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल तद्रुपच आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग