वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सद्गुरूवचनी ज्ञानाग्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075869 · अभंग क्र. २७५

275.
सद्गुरूवचनी ज्ञानाग्नि प्रगटला ।
हृदयी राहिला जयांचिया ॥१॥
तयासीच जगी ब्राह्मण म्हणावे ।
सांगितले स्वभावे मनासी या ॥२॥
विषयांचा होम ज्ञानाग्नीत करी ।
पूर्णाहुती खरी मनाची ते ॥३॥
अवभृतस्नान केले ज्ञानगंगे ।
शेष ते विभागे सेवियेले ॥४॥
बहेणि म्हणे ऐसे चिह्नी जे चिह्नत ।
ब्राह्मण निश्चित तेचि एक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग