प्रकरण :- ॥ विटाळ॥
278.
प्रकरण :- ॥ विटाळ॥
काळाचा विटाळ जीवशिवा अंगी । बांधलासे जगी दृढ गांठी ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनी । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळी विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाहाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥
