पिंडब्रह्मांडासी करो
277.
पिंडब्रह्मांडासी करोनिया ऐक्य ।
मनी महावाक्य-बोध जाला ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजे साचार ।
ब्रह्मसाक्षात्कार प्रत्यक्ष हा ॥२॥
तत्त्वमसि पदीचा शबलांश सांडिला ।
जीव शिव केला ऐक्य-ज्ञाने ॥३॥
महाकारणादि देह चार पाहे ।
शोधोनिया जाये तुर्यपदा ॥४॥
सोऽहं हंस मंत्र अखंड उच्चार ।
समाधि साचार अखंडत्व ॥५॥
बहेणि म्हणे ब्रह्मवेत्ते हे ब्राह्मण ।
यांचिया दर्शने मुक्ति जोडे ॥६॥
