विश्वाचा व्यापक विश्
277.
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रा ॥१॥
नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥
धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळा आणिताती ॥३॥
एका जनार्दनी येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥
