ब्रह्मादिका न कळे ते
275.
ब्रह्मादिका न कळे ते रुप सुंदर । गोकुळी परिकर नंदाघरी ॥१॥
रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥
गौळणीचे घरी चोरुनि लोणी खाये । पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥
एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥
