वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

चिदानंद दोंदिल बाळ स

🙏 4. संत नामदेव · ABH-083059 · अभंग क्र. २७४

274.
चिदानंद दोंदिल बाळ सावळे | कृष्ण पाहता नयनी मन मावळे ॥१॥
ते सुख कवणे वाचे बोलिजे | चित्त चैतन्य समरस भोगिजे ॥२॥
परा परतली पश्यंती तन्मया | मध्यमा वैखरी पावली हो लया ॥३॥
आलिंगना लागुनी बाह्या स्फुरती | देह न दिसे पाहता कृष्णमूर्ति ॥४॥
तेथे आर्तीचा आनंदू गोठला | तो हा कृष्णरूपे अंकुर उठिला ॥५॥
नामया स्वामी सबाह्याभ्यंतरी | गेले रसरंग गोकुळाभीतरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग