वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

गोड माझी वाणी तुम्ही

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089965 · अभंग क्र. २७६

276.
गोड माझी वाणी तुम्ही करुनि श्रीहरी ।
लावावी वैखरी कीर्तनस्तवनी आपुलिये ॥१॥
इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचे ।
अभयदान तुमचे ऐसे झालियावरी ॥२॥
बहुत दिवस आस्था मनी वाहिली हेचि ।
करावी तुमची सेवा-स्तुति निजभावे ॥३॥
निळा म्हणे चरणावरी ठेविली डोई ।
अपराध ते माझे काही मना नाणावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग