वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

पाहता पाहणे दृश्याही

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074835 · अभंग क्र. २७४

274.
पाहता पाहणे दृश्याही वेगळे ।
ते कैसे आकळे ब्रह्मतेसी ॥
पाहे तेचि पाही नाही ते काई ।
गगनीच्या पायी तूचि होसी ॥
स्वरूपी रमता हृदयस्थ आप ।
तयाचे स्वरूप आदि मधे ॥
बापरखुमादेविवरू सगुणी न माये ।
निर्गुण दिसताहे जनी वनी ॥

अर्थ :
दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीहून ब्रह्म निराळे आहे. ते या त्रिपुटीस कसे आकलन होईल. त्या परमात्म्याला तु पहा. त्याच्या ठिकाणी काही नाही. त्या गगनाच्या पायी म्हणजे परमात्म स्वरूपी तद्रुप होशील. परमात्म्याच्या ठिकाणी तू एकरूप झालास म्हणजे जगाच्या उत्पत्ति स्थिती व लय यांना तूच अधिष्ठान होशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुणच नसून जनावनामध्ये निर्गुणरूपानेही मला तोच दिसत आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग