मला तू हरी कळलासी रड
270.
मला तू हरी कळलासी रडीवाला ॥धृ॥विधीचे अक्षर खरे हे असता | अजासुताचे का जाले हाल ॥१॥
पाराशरसुत वरचढ जाला | म्हणून का त्वा फुगविले गाल ॥२॥
बळीने तुज पाहे खरीद केले | खर्चून तो धनमाल ॥३॥
नामा मनी निर्भय गुरुवर कृपे | तुजलागी देता हे प्रतिख्याल ॥४॥
