न देखवे डोळा ऐसा हा
274.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे झाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥धृपद॥
परचक्र कोठे हरीदासांच्या वासे । न देखिजेत देशे राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणे झाले ॥३॥
अर्थ :
हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहवत नाही माझे चित्त त्यांच्या दुखाने दुखी होत आहे. हे देवा अरे तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही असताना आम्हाला हे दुःख दिसले नाही पाहिजे. आहो देवा हरिदासांवर असे परचक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जेथे हरी दास राहतात तेथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हे बरोबर नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस मी तुझी भक्ती करून देखील संकटकाळी तू मदतीला येत नाहीस याचाअर्थ : माझ्या भक्तीला तू लाजविले आहेस म्हणजेच माझे जगणे ही हिनच आहे.
