चिदानंद दोंदिल बाळ ड
273.
चिदानंद दोंदिल बाळ डोळस | कृष्ण खेळविता निवे मानस ॥१॥
सये आन काही या जीवा नावडे | चित्त गुंतले त्या सुखी न निवडे ॥२॥
देहा गेहा आठव नाही सर्वथा | स्थिति बाणली सहज रूप पाहता ॥३॥
तेज सावळे दृष्टीत कोंदले | तेणे प्रकाशे सबाह्य वेधले ॥४॥
वृत्ति सहित इंद्रिये परतली | कृष्णरूपी मिळोनिया गेली ॥५॥
नामया स्वामी आदि परंपरा | आवडता आहे तो माझा सोयरा ॥६॥
