उचित अनुचित आम्ही ने
275.
उचित अनुचित आम्ही नेणो नेणती ।
सर्वोविशी मूढचि मती विदीत असावे ॥१॥
म्हणोनिया आता कृपादृष्टी अवलोका ।
वैकुंठनायका नका उपेक्षा करु ॥२॥
हीन दीन मूर्ख परि शरण तुम्हासी ।
आलो हषिकेशी अंगिकारावा ॥३॥
निळा म्हणे तुम्ही देवा कृपा सागर ।
मी तव किंकर लवण रेणू सानसा ॥४॥
