वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

स्वरूपावबोधु का फावल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074770 · अभंग क्र. २७०

270.
स्वरूपावबोधु का फावला । इंद्रियी डवरिला प्रेमभावो ॥
जाणते निवाले नेणते गुंतले । भजनेंचि गोविले विसर जावो ॥
शांतता समता निवृत्ति उदारू । वर्षांनी उद् गारू देतु असे ॥
ज्ञानदेवा धीर घटमठी सामा । अधऊर्ध्व व्योमा हरि दिसे ॥

अर्थ :
आपल्याला ब्रह्मबोध झाला आहे असे समजणाऱ्या पुरूषाला माऊली विचारतात की तुला ब्रह्मबोध झाला आहे काय? झाला आहे असे म्हणेल तर तुझ्या सर्वेद्रियांच्या ठिकाणी भगवंताच्या विषयी प्रेमभाव भरला आहे काय? असे न जाणणारे अज्ञानी जीव संसारात गुंतून राहिले आहे. व ज्यांनी हे जाणले आहे. असे ज्ञानीपुरूष समाधानाला प्राप्त झाले आहे. व त्यामुळे ते प्रपंचालाही विसरून गेले आहे. अशा अधिकारी जीवांना कृपेचा वर्षाव करून शांतता व समाधान देणारे एक श्रीगुरू निवृत्तिनाथच आहे. त्यांच्या कृपेमुळेच मला दाही दिशेला एक श्रीहरिच दिसत आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग