गोपाळ म्हणती कान्हया
267.
गोपाळ म्हणती कान्हया आमुची उमाणी ।
सांगसी तरि चरणी ठेंवू माथा ॥१॥
यावरी श्रीहरि बोले मधुराक्षरी ।
पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥
मीचि मज न देखे मी माझे नोळखे ।
कान्हो कोण्या मुखे सांगे आता ॥३॥
तव बोले गोविंदु ऐका रे सावधु
बोधी विराला बोधु म्हणोनिया ॥४॥
एक म्हणती गोपाळा । देखणा माझा डोळा ।
तरी न देखो माते आंधळा कैसेनि झाला ॥५॥
तव कृष्ण म्हणे दयोतक तूंची प्रकाशक ।
मृगजळ केवी अर्क देखेल सांगे ॥६॥
एक म्हणती गडी रसना रस निवडी ।
तरि का ने घे गोडी आपुली आपण ॥७॥
निळा म्हणे कान्हया बोले आमुच्या काजा ।
सिध्दी गेले गुज पावलेती ॥८॥
