आवो कमळनयनी चांदणे भ
272.
आवो कमळनयनी चांदणे भासिले ।
तयामाजी एक निराकार देखिले ॥
हेंही नव्हे तेही नव्हे ।
कांही नव्हे तोचि पै होय ।
बापरखुमादेविवरू नव्हताचि पै जाला ।
होऊनिया फाव फावो सरला गे माये ॥
अर्थ :
डोळ्यामध्ये सुंदर सगुण परमात्मरूपी चांदणे दिसले. त्यामध्ये निराकार अशी वस्तु पाहिली म्हणजे त्याचे ज्ञान झाले. ती निराकार असल्यामुळे अशी नाही व तशी नाही असे काहीच बोलता येत नाही. सर्व अविद्या कार्याचा लय जेथे होतो. तीच ही निराकार परमात्म वस्तु होय. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मूळचे निर्गुण असून, सगुण झाले. म्हणून भक्तांना त्याला प्राप्त करून घेणे सोपे झाले असे माऊली सांगतात.
