प्रकरण :- ॥ भाव ॥
276.
प्रकरण :- ॥ भाव ॥
आमुचा आम्ही केला भावबळी । भावे वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावे देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळे घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ॥४॥
