वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

मुक्ताफळ नथ नाकी | च

🙏 4. संत नामदेव · ABH-083042 · अभंग क्र. २७१

271.
मुक्ताफळ नथ नाकी | चरणी ल्याली वर वाकी |पितांबरे अंग झाकी | कृष्णाई माझी ॥१॥
खांद्यावरी कांबळी | पायघोळ लांबली |पांघरली धाबळी | कृष्णाई माझी ॥२॥
गाई पाठी लागली | पळता नाही भागली |मायबहीण चांगली | कृष्णाई माझी ॥३॥
देहुडा पाउली | उभी माझी माउली |विश्रांतीची साउली | कृष्णाई माझी ॥४॥
कर ठेवुनी कटावरी | उभी भीवरेचे तीरी |नाम्याची कैवारी | कृष्णाई माझी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग