ज्ञानेश्वर अभंग बोलि
272.
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां । चिदानंद बाबा लिही त्यास ॥1॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने । मुक्ताईची वचने ज्ञानदेवे ॥2॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार । परमानंद खेचर लिहित होता ॥3॥
सांगे पूर्णानंद लिही परमानंद । भगवंत भेटी आनंद रामानंद ॥4॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव । कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥5॥
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग । म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥6॥
