स्त्री पुत्र धन कोणा
274.
स्त्री पुत्र धन कोणाचे हे कोण । याचा अभिमान धरती प्राणी ॥१॥
देवांचा हा देव तया ठकविती । बापुड्या पूजिती मायराण्या ॥२॥
अगाडे बगाडे करिती नवस । ते काय आस पुरविती ॥३॥
चोखा म्हणे ऐसे आंधळे आहे जन । नाशिवंत धन मागताती ॥४॥