विषयाचे लोलंगित गुंत
269.
विषयाचे लोलंगित गुंतले हे जन । न कळे साधन यासी कांही ॥१॥
जन्मती मरती जन्मती मरती । ऐसी हे फजिती होती जाती ॥२॥
काय हे आंधळे जाणोनिया झाले । झांकिताती डोळे देखानिया ॥३॥
चोखा म्हणे ऐसे भुलोनिया गेले । शेवटी खाती टोले गांडीवरी ॥४॥
