खेळे हेटि मेटी नाचे
273.
खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी ।
धावोनिया सिव आता आत्मया श्रीहरि ॥१॥
तरिच खेळ बरा रे । नाहिंतरी चेरा ॥२॥
धावति तो पोरे पळता धरि वेगावत ।
सारुनिया मागे गिती गाई भगवंत ॥३॥
निळा म्हणे चपळपणे करि कार्यसिध्दी ।
नाही तरी पोधा होता न पवसी कधी ॥४॥
