हरी तुझी ऐसी कैसी हे
268.
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥धृ॥घेउनी चिमुटे मुळसी पळसी | गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥
सोडूनी वासरे गाईसी पाजिसी | यात तुज काय मिळती जोड ॥२॥
आडवा होऊनी गोपीसी धरिसी | चुंबिता वदन म्हणती मज सोड ॥३॥
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी | हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥४॥
