निर्गुण सगुण श्रुतीस
274.
निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । ते रुप सांवळे गोकुळी वसे ॥१॥
डेळियांची धनी पाहता न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझे ॥२॥
वेडावलीं दरुशने भांडती अखंड । वेदांचे ते तोंड स्तब्ध जाहले ॥३॥
एका जनार्दनी सांवळे सगुण । खेळतसे जाण वृदांवनी ॥४॥
